न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२३) :- गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलिसांना देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत पितळी राऊंड बेकायदेशीरपणे आरोपीने जवळ बाळगल्याची माहिती मिळाली. (दि. २२) रोजी रात्री ९.१० च्या सुमारास पिंपळे गुरव, बस स्टॉप जवळ कारवाई करीत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
सांगवी पोलिसांनी ११२/२०२३, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. विपुल अजय चव्हाण (वय २१ वर्षे, काटे पुरम चौक, आनंद पार्क, नवी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
















