न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२३) :- आयसर कंपनीच्या टेम्पोत (एमएच०३सीव्हि९१६३) आरोपीने म्हशीची कत्तल केलेल्या एकूण बारा लाखांच्या ५ टन मांसाची वाहतूक केली. म्हैस वर्गीय जनावरे कत्तल करण्याचा परवाना व पशु वैदकीय प्रमाणपत्र नसतांना विनापरवाना वाहतूक करताना आरोपी आढळून आला.
पोलिसांनी ही कारवाई (दि. २२) रोजी सायंकाळी ५.०० च्या सुमारास पुणे-मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेर उर्से टोलनाका, पोलीस चौकीजवळ केली.
आरोपीच्या विरोधात शिरगाव पोलिसांनी ८६ / २०२३ भा.दं.वि. कलम ४२९ व महाराष्ट्र प्राणी अधिनियम कलम ६.९ (अ) (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. मेहबूब शमसुद्दीन मेदरगिकर (वय ४५, रा. वळसंग, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.
















