न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२३) :- पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकाजवळ नव्याने सुरू करण्यात आलेल्या काठोळे हॉस्पिटल मल्टि स्पेशालिटी अँड ट्रॉमा सेंटरचे बुधवारी (दि..२२) गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले. चिंचवड विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते फीत कापून हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आमदार अश्विनीताई जगताप, सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, सांगवी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, हभप राघवचैतन्य काटे महाराज, हभप शिवानंद स्वामी, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, सागर आंघोळकर, महेश जगताप उपस्थित होते.

या रुग्णालयात नारी शक्तीचा सन्मान व्हावा, मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे या उद्देशाने मुलगी जन्मल्यास हॉस्पिटल बीलामध्ये ५० टक्के विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे डॉ मयुर काठाळे यांनी सांगितले. तसेच पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना उपचारामध्ये सवलत देण्यात येणार आहे.
आमदार अश्विनी जगताप तसेच शंकरशेठ जगताप व अन्य मान्यवरांनी रुग्णालयातील अद्यावत सुविधांबद्दल समाधान व्यक्त करत या रुग्णालयाच्या माध्यमातून परिसरातील रुग्णांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला.
उपलब्ध सुविधा…
रुग्णालयात जनरल दुर्बीण अँड लेप्रोस्कॉपिक सर्जन, अद्यावत आयसीयू, एन आय सी यु, प्रसूती आणि स्त्री रोग विशेष तज्ञ, डायलिसिस, एक्स-रे, सोनोग्राफी, फार्मसी, रुग्णवाहिका सेवा, त्वचा विकार तज्ञ ,सौंदर्यशास्त्र, जनरल फिजिशियन, हड्डी आणि जोड प्रत्यारोपण सर्जन, हेअर ट्रान्सप्लांट आदी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
यांचीही होती उपस्थिती…
नवनाथ जांभुळकर,उद्योजक संजय काठोळे, अशोक सोनवणे,डॉ. आदित्य पतकराव, रुग्णालयाचे संचालक डॉ मयुर काठोळे , डॉ. दिशा देढिया, डॉ.सॅम्युअल कांबळे, डॉ धिरल महाजन, प्रशाल जाधव, बळीराम घोडके,किरण संचेती , आनंद कर्णावट, अभिमन्यु गाडेकर,बाबासाहेब चितळकर, मनोजकुमार मारकड, सुरेश धाडीवाल ,शिवाजी कदम , शिवाजी कदम यांच्यासह परिसरातील विविध मंडळांचे कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हॉस्पिटलच्या उद्घाटना निमित्ताने या ठिकाणी सहावी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या पुढील काळातही गरजु रुग्ण तसेच, पोलीस कर्मचारी,पत्रकार, जेष्ठ नागरिक, बचत गटातील महिला यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ.मयुर काठोळे यांनी दिली.


















