न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२३) :- डुडूळगाव येथील अर्बनिया रियल्टी कन्ट्रक्शन या बांधकाम प्रकल्पाचे ऑफिस बंद होते. अज्ञात चोरट्याने (दि. २३) रोजी रात्री १०.०० ते (दि. २५) रोजी सकाळी ६.०० च्या दरम्यान शटर वाकउन आत प्रवेश केला. दोन लाखांचे प्लंबिंग मटेरीयल व ऑफिसमधील तीन लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी योगश बबन तळेकर (वय ४२, धंदा कन्ट्रक्शन, रा. सावतामाळी कॉलनी नं १, सावतामाळी नगर, डूडुळगाव) यांनी आरोपी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलीसांनी आरोपीच्या विरोधात १२३ / २०२३ भादवी कलम ४५७,३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.