न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२३) :- बजाज फायनान्स येथील इ.सी.एस. ऑफिस, बोरिवली येथून बोलत आहे, व्हेरीफिकेश कॉल असल्याचे आरोपीने फिर्यादीला फोनवरून सांगितले. व्हीडीओ व्हेरीफिकेशन करण्याचा बहाना करून फिर्यादी यांना मोबाईलवरून लिंक पाठवली. त्यावर फिर्यादी यांना क्लीक करण्यास भाग पाडले. फिर्यादीच्या खात्याचा अॅक्सेस घेवून त्यांच्या खात्यावरून ५ व्यवहार करून १,४५,००० रुपये वर्ग करून घेवून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २२) रोजी दुपारी २.५० ते सायं. ५.३० च्या दरम्यान ऑनलाईन पध्दतीने फिर्यादीच्या घरी रजनीगंधा हौसिंग सोसायटी, शिवराया कॉम्पलेक्स, रुमनं. २१, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे घडला.
फिर्यादी हरिष शंकर मोळावडे (वय २८ वर्षे, धंदा-नोकरी, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) यांनी आरोपी मो.नं. ९७७११४१५८१, ७२९४०४४७७२ धारक अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १३६ / २०२३ भा.दं.वि. कलम ४२०,४१९ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (सी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.