- पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ची करवाई..
- दुचाकीचे हॅन्डल लॉक अनं सिक्युरीटी सिस्टीम बसवा; पोलिसांचे दुचाकीस्वारांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहनचोरीचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ला आदेशीत केले होते. गुन्हे शाखेने कारवाई करीत दुचाकी चोरटयांना अटक केली असून वाहनचोरीचे तब्बल २१ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच सहा लाख रुपये किंमतीच्या २५ मोटर सायकली जप्त केल्या आहेत.
गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वाहनचोरीच्या गुन्हयांचा बारकाईने अभ्यास करुन विशेष योजना तयार केली होती. युनिट २ चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन वाहनचोरीच्या गुन्हयाचा समांतर तपास केला.
पोलीस नाईक १९२३ आतिष कुडके व पोलीस कॉस्टेबल १९३१ शिवाजी मुंढे यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारामार्फत माहिती दिली की, टाटा मोटर्स या ठिकाणी काही दिवसापुर्वी हेल्पर म्हणुन कामाला असलेल्या एका कामगाराच्या हालचाली संशयास्पद असुन त्याच्याकडे असलेली मोटर सायकल चोरीची असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी संशयिताची टाटा मोटर्समधुन माहीती घेतली. आरोपी कामावर येत नसल्याचे दिसुन आले. त्याचा मोबाईल नंबर प्राप्त करुन घेवून तांत्रीक तपास केला. टाटा मोटर्स परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. काही वाहनांना जीपीएस सिस्टीम बसवुन सापळा लावुन निगराणी ठेवली. तांत्रीक तपासामध्ये संशयित आरोपी हा साधारण प्रत्येक चार दिवसांनी परळी जिल्हा बीड येथे येत-जात असल्याचे दिसुन आले. त्याच्यावरील संशय वाढल्याने वरीष्ठांच्या परवानगीने गुन्हे शाखा युनिट २ चे पथक लागलीच परळी येथे गेले. आरोपी प्रदीप आबा गायकवाड (वय २५ रा. मोहा ता. परळी (वैजनाथ), जिल्हा बीड) येथे सापळा लावुन शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याजवळ चोरीची मोटर सायकल मिळुन आली.
अधिक चौकशी केली असता त्याने टाटा मोटर्स येथून सुरवातीला एक मोटर सायकल चोरुन परळी येथील त्याचा साथीदार इरफान शेख याला विक्री केली. त्यातुन चांगले पैसे मिळाल्याने व त्याला दारुचे व्यसन असल्याने टाटा मोटर्स येथून वारंवार वाहनचोरीचे गुन्हे करु लागला. दहा ते बारा मोटर सायकल चोरीला गेल्याने टाटा मोटर्स येथील सिक्युरिटी वाढविल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात इतर ठिकाणी आरोपी मोटर सायकलची चोरी करु लागला. चोरीची वाहने घेणारा त्याचा साथीदार इरफान महेबुब शेख (वय १९, रा. उड्डाणपुलाखाली, गौमतनगर, परळी, जि.बीड) याला मोटर सायकली विकल्याची माहीती दिली. इरफान शेख याला अटक करुन दोन्ही आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये एकूण २१ मोटर सायकल वाहने जप्त करण्यात आली.
वाहनचोरीच्या तपासामध्ये पोलीस हवालदार १०२३ जमीर तांबोळी, पोलीस नाईक १९२४ नामदेव कापसे यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन आकाश अनिल घोडके (वय २१ वर्षे धंदा मजुरी रा. भिमक्रांतीनगर पत्राशेड, आझाद चौक, निगडी) याला पेट्रोलिंग दरम्यान ताब्यात घेवून ४ मोटर सायकल वाहने व एक महागडी सायकल जप्त करण्यात आली. तपासामध्ये एक मोटर सायकल स्क्रॅप केल्याचे निष्पन्न झाल्याने भंगार दुकानाचा मालक अमजद जाफर खान (रा. हर्षदा हौसिंग सोसायटी लिंकरोड, चिंचवड) यास अटक करण्यात आली.
वाहनचोरीच्या तपासामध्ये सुमारे ६ लाख किंमतीच्या एकूण २५ मोटर सायकली जप्त करुन चिखली ८४/२३ भादवि कलम ३७९ मधील एम एच १४ डीह ०८६१, पिंपरी २८३ / २३ भादवि कलम ३७९ मधील एम एच १४ एफई १४११, चिखली ६३५ / २२ भादवि कलम ३७९ मधील एम एच १९ बी आर १६४५, पिंपरी २४५ / २३ भादवि कलम ३७९ मधील एम एच १४ जीई ८७८०, निगडी १३१ / २३ भादवि कलम ३७९ मधील एम एच १४- जीके ३३५०, चिखली ६४९/२२ भादवि कलम ३७९ मधील एमएच ०९ ईसी ८१२६, पिंपरी २९० / २३ भादवि कलम ३७९ मधील एमएच १० सीसी ९३०७, चिखली ३४ / २३ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४ ईए ६८८७, चिखली १११ / २३ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४ डीवाय ८२९८, चिखली ६१५/२२ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४ एफएन ०१०३, चिखली ९२/२३ भादवि कलम ३७९ मधील एमएच २५ वाय ०८३७, निगडी ८६४ / २२ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४ डीडब्लु १६०३, चिखली ६६६ / २२ भादवि कलम ३७९ मधील एमएच ११ बीयम १६१५, पिंपरी २८९ / २३ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४ जीई १०१२, चिखली ३४५ / २२ भादवि कलम ३७९ मधील एमएच १४बीएस ३२५०, वाकड ४९/२३ भादवि कलम ३७९ मधील एमएच ४ईएन ७४९३, निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ११७/२०२३ भादवि कलम ३७९ MH149945, निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ८६०/ २०२२ भादवि कलम ३७९ सायकल, पिंपरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १६ / २०२२ भादवि कलम ३७९ एम एच १४ जेक्यु ८१०२, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ११४ / २०२३ भादवि कलम ३७९ एम एच १४ ईटी ०२०८, निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १५० / २०२३ भादवि कलम ३७९ एम एच १४ बीजी ८२२२ असे २१ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
वाहनचोरी गुन्हयांच्या तपासामध्ये पोलिसांच्या असे निदर्शनास आले आहे कि, आरोपी प्रदीप आश्रुबा गायकवाड (वय २५ रा. मोहा ता. परळी (वैजनाथ) जिल्हा बीड) हा हॅन्डल लॉक नसलेल्या सहजासहजी ड्युप्लीकेट किल्ली लागेल अशा मोटर सायकली टार्गेट करुन चोरी करायचा व त्याचा साथीदार इरफान महेबुब शेख (वय १९ रा.उड्डानपुलाखाली गौमतनगर परळी जि. बीड) याला विक्री करण्यासाठी देत होता. इरफान शेख हा फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते न भरलेल्या जप्त करण्यात आलेल्या गाडया असल्याचे सांगुन परिसरातील मजुरीची कामे करणा-या गरीब गरजु लोकांना खोटे सांगुन विक्री करायचा. वाहनाची कागदपत्रे पाहून व कायदेशीर गोष्टीची पुर्तता करुन जुनी वाहने खरेदी करावी तसेच मोटर सायकल मालकांनी मोटर सायकलचे हॅन्डल लॉक करुन वाहन पार्कीगचे ठिकाणी पार्किंग करावे व शक्य झाल्यास जीपीएस सिस्टीम सारखी सिक्युरीटी सिस्टीम बसवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार केराप्पा माने, शिवानंद स्वामी, दिपक खरात, दिलीप चौधरी, संतोष इंगळे, प्रमोद वेताळ, उषा दळे, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, विपुल जाधव, देवा राऊत, आतिष कुडके, सागर अवसरे, नामदेव कापसे, शिवाजी मुंढे, अजित सानप, संदेश देशमख, उध्दव खेडकर, यांनी केली आहे.