न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२३) :- ‘ मी फेडीक्स कुरियर कंपनीमधून बोलत आहे. तुमच्या नावाचे मुंबई येथून तैवान करिता इनलिगल पार्सल जात आहे ‘ असे सांगून ‘ में सायबर काईममधून डीसीपी अजयकुमार बन्सल बोल रहा हूं ‘ अशी खोटी ओळख आरोपीने फिर्यादीला फोन करून सांगितली. फिर्यादीच्या बँक अकाउंटचे डिटेल्स घेतले.
फिर्यादी यांचे SKYPE अॅप्लिकेशनचा आयडी parulsh1607@outlook मागवून फिर्यादीच्या आयसीआयसीआय बैंक अकाउंटमधून इनलिगल ट्रान्जेक्शनचा प्रयत्न होत आहे. आपल्या बँक अकाउंटमधून आपले पैसे दुस-याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा, असे सांगून आरबीआय बँकचा अकाउंट नंबर ०४८०६३३००००३२९२ देवून यावर फिर्यादीस आयसीआयसीआय बँक अकाउंटमधून ४,९९,९९९ रुपये ट्रान्जेक्शन नंबर ३०६८११९५६३२८, ३,४१,००० रुपये ट्रान्जेक्शन नंबर ३०६८११०२५३४४ आणि १,२०,००० रुपये ट्रान्जेक्शन नंबर ३०६८१११०५७५८ असे तीन ट्रान्जेक्शन करण्यास लावले. फिर्यादीची एकूण ९,६०,९९९ रुपयांची ऑनलाईन तांत्रीक पध्दतीने फसवणूक केली आहे.
हा प्रकार (दि. ९) रोजी सकाळी ९.५३ ते दुपारी १२.२० वाजेपर्यंत प्लॉट नं ४८३, से.नं. २७ /अ निगडी प्राधिकरण येथे घडला.
२७ वर्षीय महिला फिर्यादी (धंदा नोकरी रा. प्लॉट नं ४८३ से. नं. २७/अ निगडी प्राधिकरण) यांनी आरोपी ९१९६३९९१७८६ हा अज्ञात मोबाईल धारक इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी १८६/२०२३, भा.द.वि. कलम ४२० माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ सी, डी नुसार अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.