न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२३) :- टास्क देण्याच्या कारणावरुन आरोपीने फिर्यादीकडुन वेगवेगळया यु.पी.आय.आयडी व बँक खात्यावरुन २०,१६,८५६ रुपये घेतले. त्यावर कोणताही मोबदला न देता फिर्यादीची फसवणुक करुन रक्कमेचा अपहार केला आहे, असं फिर्यादीत म्हटलं आहे.
ही घटना (दि. १५) रोजी दुपारी ३.०० ते (दि.१९) दुपारी १२.०० वाजता फिर्यादीच्या राहत्या घरी, ग्लोबल ई होम्स, विप्रो सर्कलच्याजवळ, हिंजवडी, फेज २, ता. मुळशी जि. पुणे येथे घडली.
३० वर्षिय महिला फिर्यादी (वय ३० वर्षे, रा. सध्या १०१, ग्लोबल ई होम्स, विप्रो सर्कलच्याजवळ, हिंजवडी, फेज; मुळ रा. यशोदा निवास हाऊसिंग सोसायटी, कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापुर) यांनी आरोपी [email protected], ९७८५१९७३९० मोबाईल धारक, @PAYROLLKHLOE टेलेग्राम आय. डी. महीला मोबाईल नंबर ६३९०६३५२२७९८, MS. PRADA VERSOZA टेलेग्राम आय. डी. महीला यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ३२४/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.