न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील पथ विक्रेता सर्वेक्षण (विद्यमान पथ विक्रेत्यांसह) सन २०२२-२३ पुर्ण करण्यात आलेले आहे. या सर्वेक्षणाचा कालावधी (दि. १/११/२०२२ ते ३१/१२/२०२२) असा निश्चित करण्यात आला होता.
मनपाचे कार्यक्षेत्र व व्याप्ती विचारात घेता एकही पथ विक्रेता सर्वेक्षणामधून वंचित राहू नये यासाठी दोन वेळेस संधी देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने (दि. १०/०१/२०२३) अखेर पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्रामध्ये एकूण १८६०३ इतके पथ विक्रेते व्यवसाय करताना समक्ष जागेवर आढळलेले आहेत.
अ क्षेत्रिय कार्यालयात ४४१९, ब क्षेत्रिय कार्यालय १९३९, क क्षेत्रिय कार्यालय २४४०, ड क्षेत्रिय कार्यालय ११२०, इ क्षेत्रिय कार्यालय १८३२, फ क्षेत्रिय कार्यालय २९४८, ग क्षेत्रिय कार्यालय १६६२, ह क्षेत्रिय कार्यालय २२४३ असे एकुण १८६०३ पथविक्रेत्यांची संख्या आहे.
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पथ विक्रेत्यांची प्राथमिक यादी दि. ३१/०३/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. ही प्राथमिक यादी मनपाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालय व भूमि जिंदगी विभाग, २ रा मजला, मुख्य प्रशासकीय इमारत याठिकाणी प्रसिध्द करणेत येणार आहे. त्याचप्रमाणे ही यादी पिंपरी चिंचवड
मनपाच्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
पथ विक्रेत्यांनी यादीमध्ये तपशील तपासावा. सर्वेक्षण होऊनही यादीमध्ये नाव समाविष्ट नसल्यास त्याबाबत प्रभागामध्ये अर्ज करावा. अपुर्ण कागदपत्र असल्यास त्याची पुर्तता प्रभाग कार्यालयामध्ये तात्काळ करावी. जर सर्वेक्षण राहून गेले असल्यास यादीमध्ये नाव समाविष्ट नसल्यास विहित नमुन्यात प्रभागामध्ये अर्ज सादर करावा. उपरोक्त बाबींची पुर्तता दि. ०२/०५/२०२३ पर्यंत संबंधित क्षेत्रिय कार्यालयामध्ये करावी. मुदतीनंतर प्राप्त हरकतींचा, अर्जांचा कोणताही विचार केला जाणार नाही. यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या ज्या पथ विक्रेत्यांनी कागदपत्र सादर केलेली नाहीत, अशा पथ विक्रेत्यांना जोपर्यंत कागदपत्रे सादर केली जाणार नाहीत तोपर्यंत संबंधितांची नोंदणी स्थगित ठेवण्यात येईल, आवाहन महापालिकेने केले आहे.