न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२३) :- पैशांच्या व घरगुती प्रापंचिक कारणावरुन फिर्यादीच्या मुलीचा तिच्या आरोपी नवऱ्याने राहत्या घरामध्ये कशानेतरी गळा आवळुन खुन करुन तिला जिवे ठार मारले आहे.
हा प्रकार (दि. ३१) रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास बाबासाहेब तापकीर चाळ, तापकीरनगर, काळेवाडी येथे घडला.
फिर्यादी राजेंद्र प्रल्हाद वाघमारे (वय ५२ वर्ष, धंदा-मजुरी, रा. रुम नं.१३, बेलठीकानगर, कन्हैया पार्क सोसायटी, लेन नं. ३, थेरगाव) यांनी आरोपी चुनमुन विश्वमित्रा सिंग (वय २० वर्षे, रा. बाबासाहेब तापकीर चाळ, तापकीरनगर, काळेवाडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ३२३/२०२२ भा.दं.वि. कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.












