न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२३) :- जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवुन हातात पीस्तुल व कोयत्या सारखी हत्यारे घेउन फिर्यादीचा पाठलाग केला. फिर्यादीला ठार मारण्याच्या उददेशाने दोनदा पीस्तुलमधुन फायर केले. फिर्यादीच्या आल्टो कारची तोडफोड करून गल्लीत दहशत निर्माण केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ३०) रोजी रात्री १०.२० ते १०.३० च्या सुमारास वराळे, समता कॉलनी, ता मावळ जि पुणे येथे घडली. फिर्यादी उदय अशोक लोंढे (वय २३ वर्षे, रा. समता कॉलनी, दिगंबर कुल यांच्या भाडयाच्या घरात, वराळे ता. मावळ जि.पुणे) यांनी आरोपी अनिल जगन जाधव (वय २३ वर्ष रा. चितामणी इमारत फ्लॅट नं. १२ शिक्षक कॉलनी वराळे, तळेगाव दाभाडे), बापू रीठे (वडगाव मावळ), संजय ज्ञानेश्वर माळवदकर (वय २४ वर्ष, समता कॉलनी, वराळे रोड, इद्रायणी मंगल कार्यालय जवळ, तळेगाव दाभाडे), कुमार सुरेश मोहीते (वय २० वर्षे रा. मोरया कॉलनी, विशाल लॉन्सजवळ, वडगाव), रोहन उर्फ चिक्या शिंदे (रा. तळेगाव दाभाडे), हर्ष ऊर्फ सोन्या प्रमोद साठे (वय १९ वर्ष, रा. भिमाशंकर कॉलनी, विशाल लॉन्सजवळ, वडगाव) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी ७७/२०२३ भा.दं.वि. कलम ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९,४२७, भाह काक ३/२५, ४/२५ कि लॉ अ अॅक्ट ३, ७ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.












