न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२३) :- खंडणी विरोधी पथकाकडून उघडकीस न आलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास सुरु होता. दरम्यान मधुकर पवळे शाळेसमोर, ओटा स्किम, निगडी येथे सापळा लावुन, पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले.
सुधीर उर्फ लखन मधुकर कांबळे (वय ३३ वर्षे रा. यशोदा बिल्डींग पाचवा मजला रुम नंबर ५१३. अंजठानगर, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने निगडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १४ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे दुचाकी वाहन तसेच पिंपरी चिंचवड शहरात आणखी दुचाकी वाहने चोरी केल्याचे तपासात सांगितले. त्याला दि. २७/०३/२०२३ रोजी अटक करुन त्याची ५ दिवस पोलीस कस्टडी घेवुन, कस्टडी दरम्यान तपास करुन त्याच्या कडुन २,९०,००० किंमतीच्या ७ दुचाकी हस्तगत केल्या असून ४,६५,००० रुपये किंमतीच्या दुचाकी आणि निगडी पो.स्टे.कडील २ गुन्हे, चिखली पो.स्टे. कडील ३ गुन्हे चिंचवड पो.स्टे. कडील ३ गुन्हे, दिघी पो.स्टे. कडील २ गुन्हे व सांगवी पो.स्टे. कडील १ असे एकुण ११ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले.
५ दुचाकी वाहने स्क्रॅप करणारे आरोपी रशीद मन्सुद शेख (वय ३४ वर्षे रा. दुर्गानगर झोपडपट्टी, समाधान फुट वेयर जवळ, निगडी), अन्दर शफी शेख (वय ४३ वर्षे रा. मिलींदनगर संजय हॉटेलचे समोर, बुध्दविहारामागे, निगडी), तसेच २ दुचाकी वाहने घेणारा आरोपी मयुर सुखदेव हराळ (वय ३४ वर्षे रा. सी- पत्राशेड, अजंठानगर, चिंचवड, मुळगाव मुपो. जातेगाव, ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस उप-निरीक्षक अमर राऊत खंडणी विरोधी पथक हे करत आहेत. आरोपी सुधीर उर्फ लखन मधुकर कांबळे हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरीचे असे एकुण १२ गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, मनोज लोहीया सह पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी.अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, सुनिल कानगुडे, निशांत काळे, रमेश मावसकर, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कु-हाडे, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड, प्रदीप गुट्टे व तांत्रिक विश्लेषक पोहवा नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.












