न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२३) :- सांगवडेतील जमीन गट क्रमांक २९९ मधील २४.२५ आर या जमीनीचा व्यवहार एकतीस लाख रूपयांमध्ये आरोपीबरोबर करुन त्या जमीनीचे (दि. १५/१२/२०१६) रोजी ७६६२/२०१६ अन्वये साठेखत व क्रमांक ७६६३/२०१६ अन्वये कधी न रद्द होणारे कुलमुखत्यार फिर्यादीने केले. त्याबदल्यात फिर्यादी यांनी आरोपी यांना चेक व रोख रक्कम अशी वेळोवेळी चोविस लाख रूपये दिले.
सदरची जमीन नविन शर्त ( सत्ता प्रकार ) असल्याने तो शेरा काढण्यासाठी पत्र व्यवहार चालु असताना आरोपीनी सदरची जमीन परस्पर फिर्यादी यांना कोणतीही कल्पना न देता मधुकर रतीकांत जगताप (रा. सांगवडे ता. मावळ जि. पुणे) यांना विना मोबदला हक्कसोड करुन देवुन फिर्यादी यांची फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी जयद्रथ आत्माराम आखाडे (वय ६५ वर्षे, धंदा रिटायर, रा. त्रिवेणीनगर) यांनी आरोपी शाबु दगडु जगताप (रा. सांगवडे, ता मावळ, जि पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. शिरगाव पोलिसांनी ९४/२०२३ भा.द.वि ४२० नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.












