न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२३) :- सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगातील विसंगती दुर करणे, वैद्यकीय पेन्शनमधील विसंगती संपविणे या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माजी सैनिक जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार आहेत. २ हजार माजी सैनिकांसह सोमवारी (दि. ३) हे आंदोलन करण्यात येणार आहे.
निगडीत संत ज्ञानेश्वर बागेत भारतीय भूतपूर्व सैनिक संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत माजी सैनिकांना आंदोलनाचा निर्धार केला. या बैठकी वेळी इंडियन एक्स सर्विसेस लोगचे माजी सुभेदार मेजर यशवंत महाडिक, सुभेदार मेजर एस. एस. खोत, सार्जंट एम. एन. भराटे, नायब सुभेदार अर्जुन माळी, सार्जंट संजीव गांधी नायक, डी. आर. पडवळ, सुभेदार संभाजी धुमाळ, हवालदार रामदास मदने आदीसह माजी सैनिक, संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. या मागण्यांमध्ये सहावा आणि सातवा वेतन आयोग, मिलिटरी सर्विस पे एमएसपी, वैद्यकीय पेन्शन, वीर नारी, वीर पत्नी यांच्या निवृत्ती वेतनातील विसंगती दूर करणे, सहाय्यक प्रथा, जुने कायदे बदली करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. सेंट्रल बॉडीमध्ये जेसीओ, ओआरएस पदावर नियुक्ती करणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.












