- वाढदिवसाच्या फ्लेक्सवरून आमदारांचा फोटो गायब; राजकीय चर्चांना उधान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२३) :- पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांचा जनसंपर्क सध्या कमी होत चालला आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाल्याचे मतदारसंघात चित्र आहे.
गत पिंपरी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांना तिकीट मिळाले होते. मात्र, राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवाणी यांनी माजी महापौर योगेश बहल व इतर नेते मंडळीना एकत्र करून रातोरात अण्णा बनसोडे यांना एबी फॉर्म मिळवून दिला होता. सुलक्षणा धर यांचा पत्ता कट केला होता. अण्णा बनसोडे यांना विजयासाठी मदत केली होती.
सध्या अज्ञात कारणावरून दोघांत वितुष्ट निर्माण झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. डब्बू आसवानी यांचा नुकताच ३१ मार्चला वाढदिवस झाला. वाढदिवशी लावलेल्या फ्लेक्सवर अण्णा बनसोडे यांचा फोटो नव्हता. इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो होते. त्यामुळे आसवानी यांनी अण्णा बनसोडे यांची साथ सोडली आहे?, अशी मतदारसंघात चर्चा सुरु आहे.












