न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२३) :- बंदी घातलेला बेटींगचा व्यवसाय आरोपीने केला. त्यातुन काळया पैशाची आर्थिक उलाढाल करून शासनाची फसवणुक केली आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-२ ने कारवाई केली. कारवाईत १,८०,५०० रुपये किंमतीचे बेटिंग लावण्याची साधनं जप्त केली.
पोलिसांनी ही कारवाई (दि. २) रोजी सायंकाळी ७:१० वाजेच्या दरम्यान फ्लॅट नं. ०५, मिनाक्षी को. ऑप. हौसिंग सोसा. प्लॉट नं. ६३, पॉवर हाऊस रोड, पिंपरी येथे केली. पिंपरी पोलिसांनी ३९४ /२०२३, भा.द.वि. कलम ४२०, ४६५, ४६८ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ (अ), ५, व भारतीय टेलीग्राफ अॅक्ट कलम २५ (क) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी लखु मोहनदास रखयानी (वय ३८ वर्षे, धंदा- काही नाही रा. फ्लॅट नं. ०५, मिनाक्षी को. ऑप. हौसिंग सोसा. प्लॉट नं. ६३, पॉवर हाऊस रोड, पिंपरी) याला सी.आर.पी.सी.४१ (अ) २ नुसार नोटीस दिली आहे.
















