न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२३) :- ‘ मला अर्जंट घरी फोन करायचा आहे. माझा फोन बंद झाला आहे, तुझा फोन दे’, असा हॉरनेट कंपनीच्या दोन्ही बाजुस नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन आलेला आरोपी फिर्यादीला म्हणाला. त्याला फोन न देता फिर्यादी तसेच पुढे गेले. दरम्यान आरोपीने फिर्यादीला अडवून खिशातील चाकुचा धाक दाखवला. फिर्यादीचा १०,००० रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा एम २१०१ के ७ बी आय मॉडेलचा मोबाईल फोन आणि त्यातील एअरटेल कंपनीचे सीम कार्ड नं. ७५५८४९७७६२ असलेला हातातील मोबाइल जबरदस्तीने व बळजबरीने हिसकावुन घेत आरोपी दुचाकीवरुन पळुन जाऊ लागला. फिर्यादी यांनी आरडा ओरड केल्याने रस्त्याच्या बाजुने जात असलेल्या दोघांनी आरोपीला चाकुसह पकडले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ३) रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास निघोजेतील महिन्द्र सर्कल ते निघोजे गावाकडे जाणा-या रस्त्यावर घडली.
फिर्यादी ललित दिलीप सोनवणे (वय २२ वर्षे, धंदा खाजगी नोकरी, रा. संतोष येलवंडे यांच्या खोलीत, निघोजे; कायमचा पत्ता, सावखेडा, ता. रावेर, जि. जळगाव) यांनी आरोपी गुलाब अब्दुल गफार (वय २५ वर्षे, रा. गणेशनगर, तळवडे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी १७५ / २०२३ भादवि कलम ३९२, मु पोकाक ३७ (१) (३), १३५ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
















