न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२३) :- आधार कार्डवरील आधार नंबरचा व आधारकार्ड फोटोचा आंतरराष्ट्रीय दहशतवादासाठी गैरवापर होउ शकतो, अशी भीती घातली. बँक खात्यावारून ६ व्यवहार झाले असुन त्यांचा गैरवापर झाला आहे. मी अजयकुमार बन्सल आय.पी.एस.अधिकारी बोलत असल्याचे भासवून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
सहा व्यवहाराच्या तपासाकरीता प्रत्येकी ९८,३२६ रुपये सिक्युरिटी म्हणुन ट्रान्सफर करावे लागतील, असे खोटे सांगुन आरोपीने ५,८९,९५६ रुपये त्याच्या एस बँकेचे खाते क्रमांक ०४२२६३३००००६६०३ व ०१८९६३४००००९०४७ यावर ट्रान्सफर करण्यास भाग पाडुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. २७/०३/२०२३) रोजी सायंकाळी ५.१५ ते ७.३० च्या दरम्यान घडला.
फिर्यादी महिला यांनी आरोपी मो. नंबर ९३६८३१७२९४ धारकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १५८/२०२३ भादवी कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.


















