न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२३) :- पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातून एका वर्षासाठी आरोपीला तडीपार केले आहे. दरम्यान आरोपीने कोणतीही परवानगी न घेता (दि. ३) रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान अबूशेठ रोड, पारशी चाळ, सार्वजनिक स्वच्छतागृहासमोर, देहूरोड या प्रतिबंधीत क्षेत्रात जाऊन लोखंडी कोयता हातात घेवून, मोठमोठ्याने आरडाओरड करून तेथील लोकांमध्ये दहशत निर्माण केली.
देहूरोड पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर पोलीस ठाण्यात २३८/२०२३ भारतीय शस्त्र कायदा ४ (२५), क्रिमीनल लॉ अॅक्ट ७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चेकलम १४२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
निखील ऊर्फ चिक्या भिकू वाल्मीकी (वय २५ वर्षे, रा. पंडित जवाहरलाल मंगल कार्यालयसमोर, सम्राट हेअर सलून जवळ, मेन बाजार, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
















