- २३ मोबाईल, २ तोळे सोने, ९ मोटार सायकल व हत्यारासह ५,१५,३०० लाखांचा मुद्देमाल हस्तगत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल २०२३) :- हत्याराचा धाक दाखवुन कंपनी कामगारांना लुटणारी टोळी चोरीचे मोबाईल सी.एन.जी. पंपापाठीमागे, जाधववाडीकडुन टेल्को कंपनीकडे जाणा-या शिवरोडजवळ, एमआयडीसी भोसरी येथे रस्त्याने जाणाऱ्या लोकांना विकण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट १ ला मिळाली. पोलिसांनी कारवाई करीत टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडून २३ मोबाईल, २ तोळे सोने, ९ मोटार सायकल व हत्यारासह ५,१५,३०० रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच विविध पोलीस ठाण्यातील नऊ गुन्ह्यांची उकल केली आहे.
सोमा दुर्गप्पा चौधरी (वय १९ वर्षे, रा. ७८६ / मुन्नाभाई चाळ, पवार पेट्रोलपंप जवळ, नेहरुनगर, पिंपरी), आदित्य सुरेश कोळी (वय १८ वर्षे, रा ७८६/मुन्नाभाई चाळ. पवार पेट्रोलपंप जवळ, नेहरुनगर, पिंपरी), मुदस्सर अहमद सय्यद (वय-२१ वर्षे रा ४२० / ४०१८, वल्लभनगर, बॅडमिंटन हॉल जवळ, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी हे एमआयडीसी भोसरी, सांगवी, वाकड व हिंजवडी भागात पहाटे कामावरुन येणा-या जाणा-या कामगारांना तसेच वाटसरूंना एकटे गाठुन हत्याराचा धाक दाखवुन त्यांच्याकडील मोबाईल व इतर मौल्यवान वस्तु चोरी करीत होते. त्यांच्यावर एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाणे गुरजि.नं. ४६८ / २०२२ भादवी कलम ३८०, ३४, एम. आय. डी. सी. भोसरी पोलीस ठाणे गु. रजि.नं. ५० / २०२३ भादवी कलम ३९४, ३४ सह आर्म अॅक्ट कलम ४(२५), एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाणे गु. रजि. नं. ११८/२०२३ मादवी कलम ३९२, ३४ सह आर्म अॅक्ट कलम ४(२५), एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाणे गु. रजि.नं. ११९ / २०२३ भादवी कलम ३९२, ३४ सह आर्म अॅक्ट कलम ४(२५), एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाणे गुरजि.नं. १२०/२०२३ भादवी कलम ३९२, ३४, एम. आय. डी. सी. मोसरी पोलीस ठाणे गु.रजि.नं. १२८/२०२३ भादवी कलम ३९२ ३४ सह आर्म अॅक्ट कलम ४ (२५), एम. आय. डी. सी. भोसरी पोलीस ठाणे गु. रजि.नं. १३४/२०२३ भादवी कलम ३९२, ३४ सह आर्म अॅक्ट कलम ४(२५) सह मपोका कलम ३७(१)(३),१३५, सांगवी पोलीस ठाणे गु. रजि. नं. ९४/२०२३ भादवी कलम ३९४,३२३.३४ सह मपोका कलम ३७(१)(३),१३५, सांगवी पोलीस ठाणे गु. रजि. नं. १५१/२०२३ भादवी कलम ३९२.५०६, ३४ असे नऊ गुन्हे दाखल आहेत. आरोपींना पुढील कारवाईसाठी एम.आय.डी.सी. भोसरी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरीत मुद्देमालाबाबत अधिक तपास करुन आणखीन गुन्हे उघकीस येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख पो. अंमलदार फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, स्वप्नील महाले, मारुती जायभाय, विशाल भोईर यांनी केली आहे.
















