न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल २०२३) :- वाकड येथील काळाखडक बालाजी कॉलेज समोर महिलेने ५०,५०० रुपये किंमतीचा २ किलो २० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगला.
अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (दि. ४) रोजी दु. १३.१० वाजता कारवाई करीत महिलेला ताब्यात घेतले. वाकड पोलिसांनी तिच्यावर ३३६ / २०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २० (ब) (ii)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















