न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२३) :- कोकण खेड युवाशक्तीचा ५ वा वर्धापनदिन इंदू लॉन्स, काळेवाडी येथे नुकताच साजरा करण्यात आला. कोकण खेड युवाशक्तीच्या माध्यमातून मागील अनेक वर्षे सामाजिक हिताचे, सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. युवाशक्तीच्या या यशस्वी वाटचालीसाठी सर्व कोकणवासीय समाजबांधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये ५५ लोकांनी सहभाग घेतला, त्यानंतर स्नेहमेळावा, महिलांसाठी खेळ पैठणीचा व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. तसेच स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. तसेच कोकण सुपुत्र, हास्यविनोद, कलाकार, अभिनेते अंशुमनदादा विचारे हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले, पिंपरी चिंचवड मधील अनेक प्रतिष्ठित मान्यवर, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते.
कोकण खेड युवाशक्तीचे अध्यक्ष सुरज उत्तेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी युवाशक्तीचे सर्व कार्यकारणी, सभासद, मार्गदर्शक, सल्लागार उपस्थित होत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक अक्षय मोरे व प्रा. संदिप कदम यांनी केले तर, प्रा.संदीप कदम यांनी आभार मानले.















