न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२३) :- बंगलोर येथील गोपाळ इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित तीन दिवसीय १७ व्या राष्ट्रीय ऐरोबिक जिम्नास्टीक स्पर्धेत हेवन जिम्नास्टीक अकादमीच्या ७ खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत सृष्टी खोडके हिने ११ वर्षातील वैयक्तिक महिला प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले आहे.
गेल्या वर्षीदेखील सृष्टी ने याच गटात सुवर्ण पदक प्राप्त केले होते. अकादमीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांनी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले तर प्रशिक्षक अलका तापकीर यांनी प्रबंधक म्हणून काम केले.
खेळाडूंच्या उत्तम यशाबद्दल पिंपरी चिंचवड जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंगोडेकर, सचिव संजय शेलार, हेवन जिम्नॅस्टिक्स अकादमीचे प्रशिक्षक चैतन्य कुलकर्णी, अकादमीचे मार्गदर्शक मा. नगरसेवक विनोद तापकीर, नविन तापकीर व हेवन जिम्नास्टीक अकादमीच्या पालकांनी खेळाडूंचे कौतुक केले.
अकादमीच्या खेळाडूंनी ११ वर्षातील वैयक्तिक महिला गटात सृष्टी खोडकेने सुवर्ण पदक, तिहेरी प्रकारात अंतरा कळमकर, धानी पटेल, सानवी पाटील, १७ वर्षातील तिहेरी गटात परीजा क्षीरसागर, वृंदा सुतार, अपेक्षा शेलार यांनी यश प्राप्त केले.















