- पुण्यातील त्या कार्यक्रमास लावली सपत्नीक हजेरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२३) :- मागील १८ तासांपासून नॉट रिचेबल असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील खराडी परिसरातील रांका ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे आज उद्घाटन केले.
अजित पवार यांचे काल पुण्यात नियोजित तीन कार्यक्रम होते. पण काल अचानक दुपारी दोन वाजता अजित पवार यांनी तिन्ही कार्यक्रम रद्द केले. त्याबाबतचे कारण समोर न आल्याने अजित पवार हे नेमके कुठे गेले? हे कोणाला समजले नाही. त्यानंतर आजदेखील आठ कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे मागील १८ तासांपासून नॉट रिचेबल असणारे अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत पुण्यातील खराडी भागातील रांका ज्वेलर्सच्या नव्या दालनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला दिसून आले.
अजित पवार नॉट रिचेबल असल्याने विविध चर्चांना उधान आले होते. त्यातच आपच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी एक सूच ट्विट केलं होतं. त्यामुळे चर्चांना आणखी उधान आले. अजित पवार सकाळी पुण्यात होते. त्यांनी पुण्यातले कार्यक्रम रद्द केले आणि तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत, अशा चर्चा होत्या. आता अजित पवार पुण्यातील कार्यक्रमात दिसून आल्याने नॉट रिचेबलच्या प्रकरणावर पडदा पडला आहे.












