न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२३) :- भोसरीतील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेच्या सन 2023 ते २८ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. मगर बँकेच्या संचालक संचालक मंडळाच्या 15 सभासदांच्या पॅनलवर प्रगती पॅनलने सर्व जागा विजयी होऊन आपले संचालक मंडळावर वर्चस्व ठेवले. अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये शेवटपर्यंत प्रगती पॅनलचे वर्चस्व कायम राहिले. सभासदांच्या विश्वास दाखवून नंदकुमार लांडे यांच्या नेतृत्वाखाली बँक पुन्हा प्रगती पॅनल कडे गेली. या विजयानंतर सभासदांनी मोठा जल्लोष करत भंडारा व फटाके फोडत आपला आनंद व्यक्त केला.
जागोजागी विजय उमेदवारांची सुवासिनीं ओवाळून औक्षण केले. सर्वसाधारण गटातील 10 ,महिला गटातील दोन ,इतर मागास स प्रवर्गातील एक , मागास प्रवर्गात एक, अनुसूचित जाती जमाती एक ,असे सर्व 15 जागा वरील उमेदवार प्रगती पॅनल ने जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिग्विजय आहेर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून श्री चव्हाण यांनी काम पाहिले.
विजय उमेदवार व त्यांना मिळालेली मते :- सर्वसाधारण गट नंदकुमार लांडे (2149) सीए चेतन आहेर (2118) विजय गवारे (2103) प्राध्यापक राजेश सस्ते (2070) सोनल लांडगे (2067) गणेश पवळे (2042) रामदास काळजे (2018) राजाराम ढेरंगे (1993) संतोष भांगरे (1973) सीए अमेय दर्वे 1887 सुगंधा लांडे (2148) राजश्री हुलावळे (2144) मनोज बोरसे (2205) शंकर मेटकरी (2116) दीपक डोळस (2217).
“निवडणुकीच्या पहिल्या दिवसा विजयाची खात्री होती सभासदांनी जो विश्वास प्रगती पॅनलवर दाखवला तो सार्थ ठरवत बँकेची सर्वांगीण प्रगती व आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक हे घोषवाक्य सभासद ठेवीदार कर्जदार यांच्या सर्वांचा विश्वास सार्थ ठरवेल. बँकेचे हित हेच बँकेच्या प्रगतीचे द्वार आहे त्या दृष्टीने सर्व सभासदांच्या एकोप्याने काम करून बँक पुन्हा एकदा प्रगती पथावर घेऊन जाईल.”
– नंदकुमार लांडे, प्रमुख मार्गदर्शक व पॅनल प्रमुख…