न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२३) :- ‘ तु सारखं मला का फोन करतो ‘ असे फिर्यादी यांनी आरोपीला विचारलं. आरोपीने फिर्यादच्या मानेवर चाकु मारुन खल्लास करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांना गंभीर जखमी केलं, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १०) रोजी सायंकाळी ७.१५ वाजता छत्रपती महाराज शाळेजवळ, भोसरी येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी विनायक सर्जेराव कांबळे (रा. जाधववाडी, चिखली) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ३३२/२०२३भा. दं.वि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.