- शहर सायबर पोलिसांची मोठी कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२३) :- देशातील अति महत्वाच्या नेत्यांचे व्हिडीओ आणि फोटो अश्लील पद्धतीने मॉर्फ करीत यू ट्यूबवर अपलोड करणाऱ्या आरोपीला शहर सायबर शाखेच्या पोलिसांनी झारखंडमधील रांची येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. शमीम जावेद अन्सारी असे अटक आरोपीचे नाव आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून आरोपीचा सायबर पोलीस शोध घेत होते. आरोपीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे व्हिडीओ आणि फोटो मॉर्फ करून ते यूट्यूबवर अपलोड केले होते.
भाजपाचे माजी खासदार अमर साबळे यांनी याबाबत पिंपरी-चिंचवड शहर सायबर विभागात तक्रार केली होती. आरोपीने एक हजाराहून अधिक व्हिडीओ यूट्यूबवरून सर्च केले असल्याची माहिती अमर साबळे यांनी दिली.