- पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त; हिंजवडी पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२३) :- हिंजवडी फेज ३ परिसरात पेट्रोलींग करीत असताना हिंजवडी पोलिसांच्या तपास पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगार जबरी चोरीच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. काळया रंगाच्या स्प्लेंडरवर दोघे संशयीतरित्या फिरताना आढळले. फेज २ सर्कल, हिंजवडी येथून जबरी चोरी व वाहन चोरी करणाऱ्या दोन चोरांना हिंजवडी पोलीसांनी बेड्या ठोकल्या. दोघांकडून चोरलेल्या पाच दुचाकी व दोन मोबाईल फोन असा एकूण २,७०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अनिकेत तुकाराम पवार (वय १९, रा. बाळु ओझरकर यांची रुम, ओझरकरवस्ती, माण, मुळशी, पुणे), अक्षय विलास नागरे (वय १९, रा. आण्णा कुंजीर यांची रुम, फेज २ माण, मुळशी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपीने हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. त्यांच्याकडुन एकूण पाच दु व्हीलर व दोन मोबाईल फोन असा एकुण दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १६०/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे, हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १७५/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे, हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १८२/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे, हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १४२/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे, हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ३२/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगीरी विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मनोज लोहीया सहा पोलीस आयुक्त, संजय शिंदे अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीकांत डिसले सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग, डॉ. विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे, सुनिल दहिफळे, सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), हिंजवडी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील सागर काटे, राम गोमारे सहा. पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस उप निरीक्षक बंडु भारणे, बाळकृष्ण शिंदे, पो हवा. बापु धुमाळ, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, पोलीस नाईक रितेश कोळी, अरुण नरळे, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, पोलीस शिपाई अमर राणे, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, दत्तात्रय शिंदे, नरेश बलसाने व परिमंडळ २ ऑफिसचे पोलीस शिपाई पंडीत यांनी केली.