न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२३) :- पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोरवाडी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष आ. महेश लांडगे, आ. उमा खापरे, प्रदेश सचिव अमित गोरखे, राजेश पिल्ले, अमोल थोरात, सुभाष सरोदे, सुजाता पालांडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
















