- मुरलीधर मोहोळांनी घेतली संघटनात्मक बैठक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२३) :- पिंपळे सौदागर येथे भाजपची चिंचवड विधानसभा मतदारसंघाची संघटनात्मक बैठक शुक्रवारी (दि. १४) पार पडली. बुथ सक्षमीकरण अभियानाचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी मतदारसंघातील संघटनेचा आढावा घेतला. पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम ताकदीने यशस्वीपणे राबवा, असे आवाहन त्यांनी माजी नगरसेवक व शक्ती केंद्रप्रमुखांना केले
या बैठकीला भाजप शहराध्यक्ष आ. महेश लांडगे, आ. अश्विनी लक्ष्मण जगताप, नामदेव ढाके, अमोल थोरात, ॲड. मोरेश्वर शेडगे, झामाबाई बारणे यांच्यासह चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे सर्व माजी नगरसेवक व शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ यांनी सर्व माजी नगरसेवक व शक्तीकेंद्र प्रमुखांना बुथ सक्षमीकरण अभियान, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय सप्ताह, येत्या ३० एप्रिल रोजीचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १०० वा ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन, पक्ष सदस्य नोंदणी अभियान या प्रमुख कार्यक्रमांसोबतच पक्षाचे अगामी सर्व कार्यक्रम व अभियानांची पूर्ण माहिती दिली. तसेच चिंचवड विधानसभेतील चिंचवडगाव-किवळे मंडल व सांगवी-काळेवाडी या दोन्ही मंडलांचा संघटनात्मक व बुथ सक्षमीकरण अभियानाचा त्यांनी आढावा घेतला.
















