न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२३) :- लग्नाचे अमिष दाखवले. फिर्यादीच्या बहीणीची मुलगी ही नाबालीक आहे, हे माहित असतानाही आरोपीने तिला फुस लावुन दुचाकीवरुन यमुनानगर येथील लॉजवर नेले. तिच्यावर जबरदस्ती केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १२) रोजी पहाटे ५.०० ते (दि. १३) रोजी दुपारी २.०० पर्यंत रूपीनगर, तळवडे येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी अजित पाटील (वय २५ वर्षे, रा. सांगली) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २५५/२०२३ भा.दं.वि कलम ३६३ ३७६ पोक्सो कलम ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.