न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२३) :- वादळी पावसाने (दि. १७) सायंकाळी किवळे येथे अनधिकृत होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात पाचजण मृत्युमुखी पडले, तर तिघे गंभीर जखमी झाले.
या दुर्घटनेवरून बोध घेत पालिका प्रशासनाने शहरातील सर्व १४०७ होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय आज घेतला आहे. याबाबत महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पत्रकारांना माहिती दिली.
दरम्यान, या होर्डिंग दुर्घटनेनंतर शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी पालिका प्रशासन तथा प्रशासकांना आज लक्ष्य केलं. अनधिकृत होर्डिंग्जचे ऑ़डिट करण्याची मागणी त्यांनी केली. तर, मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे बेकायदेशीर होर्डिंग्ज विरुद्धची कारवाई रखडल्याची पळवाट आयुक्तांनी शोधली.


















