न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२३) :- भोसरीतील मे. भांबुर्डेकर सराफ अॅन्ड ज्वेलर्स या दुकानातील फॅन्सी टॉप्स काउंटरवर फिर्यादी या काम करीत होत्या. दरम्यान (दि. १५) रोजी दुपारी ३:२० च्या सुमारास दुकानात आलेल्या दोन अनोळखी महिलांपैकी डोक्यास व तोंडास सफेद रंगाचा स्कार्प बांधलेल्या महिलेने कानातील टॉप्स बघण्याचा बहाणा केला.
फिर्यादी यांनी तिला दाखविलेले कानातील ६ टॉप्सचे जोड हातावर घेतले. त्यानंतर टॉप्सचे जोड फिर्यादी यांना परत देताना अंदाजे ६६,००० रुपये किंमतीची ११:३५ ग्रॅम वजनाची कानातील सोन्याचा टॉप्सची एक जोडी हातचलाखीने तिच्या हाताच्या अंगठयाखाली लपवुन फिर्यादी यांना कळू न देता फसवणुक करुन घेवुन गेली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
महीला फिर्यादीने आरोपी अज्ञात महिलेच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ३६१/२०२३, भा.द.वि. कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.