न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२३) :- एनकेजी एसबी बँक, चिंचवड येथील शाखेमधुन दोघांनी कर्ज काढले होते. या कर्ज प्रकरणामध्ये आरोपी यांनी त्यांच्या मालकीची चिखली प्राधिकरणातील मिळकतीवरील रो हाऊस तारण म्हणुन बँकेकडे ठेवला होता. आरोपी यांनी बँकेचे कर्ज थकविल्यामुळे बँकेने कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन आरोपी यांच्या मिळकतीवरील रो हाऊस जप्त करुन मिळकत सील केलेली होती.
आरोपीच्या मालकीचे रो हाऊस बँकेने सील केलेले असल्याचे आरोपी यांना माहीत असताना देखील आरोपी यांनी बँकेची अगर कोणत्याही न्यायालयाची पूर्वपरवानगी न घेता मिळकतीचा मुख्य दरवाजा व मेनगेटला लावलेले सीलबंद कुलूप तोडुन अनधिकृतपणे घर / मिळकतीमध्ये प्रवेश केला.
हा प्रकार (दि. १८) रोजी सायंकाळी ६.०० वाजता घडला. चिखली पोलीस ठाण्यात पोलिसांनी दोघांवर २७५/२०२३ भादविक ४४८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.