न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२३) :- आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्या पिंपरीतील तिघांवर गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली आहे.
रोमी सुरेश नेहलानी (वय-३६ वर्षे रा. एचबी २८/१, दिप मोटर्स समोर, वैष्णव माता मंदीराजवळ, पिंपरी), विनोद राजु सतिजा (वय-३२ वर्षे रा. सुखवाणी किस्टल, सी / ७०१, पिंपरीगाव), लखन राजु गुरुबानी (वय २४ वर्षे रा. आयप्पा मंदीराजवळ, आयप्पा कृपा बिल्डिंग, फ्लॅट नं.२. पिंपरी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पेट्रोलिंग दरम्यान याबाबत पोलीस नाईक शैलेश मगर यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने लेक पॅराडाईज सोसायटी, रो हाऊस नं. ४४, तळेगाव दाभाडे या ठिकाणी छापा मारला. त्यांच्याकडुन क्रिकेट बेटींग करीता वापरत असलेले ०७ मोबाईल फोन, एक लॅपटॉप, ०५ वह्या, ०२ पेन व ४,५०० रुपये रोख रक्कम असा एकुण ९६.७८५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याविरुध्द तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये रजि नंबर २१४ / २०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५, इंडियन टेलीग्रॅम अॅक्ट कलम २५ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सहा पोलीस निरीक्षक उध्दव आर खाडे हे करत आहेत.
ही कारवाई विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त, मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे, निशांत काळे, किरण काटकर, विजय नलगे, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, प्रदीप गुट्टे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहवा नागेश माळी यांनी केली आहे.