न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका, क्रीडा विभाग, भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी संगीत अकादमी आयोजित “वासंतिक संगीत शिबीर २०२३” चे आज (दि. १९) रोजी गायक, संगीतकार, दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनी स्वर, लय, शब्द, भाव या सगळ्यांचा उपयोग गाण्यात कसा करावा. हे सर्व प्रात्यक्षिकांसह समजाऊन सांगितले.
नवरसातील गीते गाऊन फरक दाखवून दिला. ताल तयार होण्यासाठी कसा रियाज करावा यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच माईक टेक्नीक, श्वास, उच्चार या विषयी मार्गदर्शन केले व आलेल्या सर्व शिबिरार्थीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली व ” ऐसे काही व्हावे मन शांत निजावे, चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे; मातीतल्या कणसाला मोतीयाचे दाणे ” ही गाणी बसवून घेतली.
शिबीराचे सुचसंचालन समीर सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास उप आयुक्त मनोज लोनकर, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, क्रीडा पर्यवेक्षक अरुण कडुस तसेच संगीत शिक्षक समिर सुर्यवंशी, नंदीन सरीन, उमेश पुरोहित, मिलिंद दलाल, संतोष साळवे, विनोद सुतार, वैजयंती भालेराव, स्मिता देशमुख उपस्थित होते.


















