न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२३) :- ‘तुला कापड दुकान चालवायचे असेल तर, दर महिन्याला १०,००० रुपये हप्ता द्यावा लागेल. हप्ता दिला नाहीतर तुला दुकानासह जाळून टाकतो’ अशी धमकी देत आरोपी माधव वाघमारे, आतिश शिरसाट व साथीदार यांनी ५०० रुपये खंडणी घेतली.
दुकानातील १३५० रुपये किंमतीचे ३ शर्ट जबरदस्तीने घेत दुकानदाराच्या वडीलांना हाताने मारहाण केली, अशी फिर्याद पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीने दाखल केली होती.
त्यानुसार आरोपींच्या विरोधात रजि नंबर ४५५/२०२३ भादवि कलम ३८६.३८७.३९२.३२३, ५०४,३४ अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकणी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई करीत आरोपीला अटक केली आहे. माधव वाघमारे (रा. लिंकरोड पत्राशेड, पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
















