न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२३) :- स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी भारत सरकारने बंदी घातलेला बेटींगचा व्यवसाय केला. पैशाची आर्थिक उलाढाल करून शासनाची फसवणुक केली आहे.
याप्रकणी गुन्हे शाखा युनिट-२ ला माहिती मिळाली. पोलिसांनी (दि. १८) रोजी रात्री १०:५५ च्या सुमारास अदि अम्मा लेस होसिंग सोसा. बिल्डिंग फ्लॅट नं. १०३, विजयनगर, काळेवाडी येथे कारवाई केली. आरोपीकडून २५,०१५ रुपये किंमतीचे तीन मोबाईल फोन जप्त केले.
वाकड पोलिसांनी हरीश दयालदास गुलानी (वय ४६ वर्षे, विजयनगर, काळेवाडी) आणि महीला आरोपी यांच्या विरोधात ३९१ /२०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ (अ) व भारतीय टेलीग्राफ अॅक्ट कलम २५ (क) २०२१-२२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















