न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक पतसंस्थेची सन २०२३-२०२८ साठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच संपन्न झाली. दरम्यान आज गुरुवारी (दि. २०) रोजी पंकज राऊत, निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर-३ यांचे अध्यक्षतेखाली कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या उपस्थितीमध्ये नवनिर्वाचीत संचालकांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी सनी दिलीप कदम, व्हाईस चेअरमनपदी अनिल मदनलाल लखन, सचिवपदी वैभव जनार्दन देवकर व खजिनदारपदी श्रीमती. विजया प्रविण कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक पतसंस्थेच्या चारुशिला जोशी, विशाल भुजबळ, सनी कदम, विश्वनाथ लांडगे, शिवाजी येळवंडे, संदिप कापसे नथा मातेरे, वैभव देवकर, विजय नलावडे, भास्कर फडतरे, चंद्रकांत भोईर, योगेश रानवडे. कृष्णा पारगे, गणेश गवळी, अभिषेक फुगे, विजया कांबळे, ज्ञानेश्वर शिंदे, विजय मुंडे, अनिल लखन तसेच पतसंस्थेचे माजी चेअरमन सीमा सुकाळे, माजी संचालक मनोज माछरे, संजय कुटे, आबा गोरे, दत्तात्रय ढगे, दिलीप गुंजाळ, महादेव बोत्रे, व्यवस्थापक प्रल्हाद सुतार तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पतसंस्थेचे नवनिर्वाचीत पदाधिकारी व विद्यमान संचालक मंडळ यांनी शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेचा कारभार हा विनम्र, तत्पर सेवा व पारदर्शक व्यवहार व्यवस्थितरित्या चालविण्याचा संकल्प केला आहे. तसेच पतसंस्थेचे जास्तीत जास्त सभासद नव्याने करुन घेवुन सर्व सभासदांना बचतीच्या सवयी लागण्यासाठी ठेवी व आवर्तक ठेवी जमा करण्यावर भर देणार आहे. पतसंस्थेमार्फत सभासदांच्या ठेवींवर जास्तीत जास्त व आकर्षित व्याजदर असल्याने सभासदांकडून ठेवी स्विकारुन पतसंस्था स्वभांडवलावर उभी करण्याचे धोरण ठरविले आहे.
















