न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२३) :- ‘ओ.एल.एक्स अॅपवर फ्रिज विकायचा आहे’, अशी जाहिरात फिर्यादीने दिली होती. अनोळखी व्यक्तीने फिर्यादीच्या मोबाईलवर फोन करुन त्याचे नाव राहुल शर्मा असे सांगितले. तुमचा जुना फ्रीज विकत घ्यायचा आहे. असे सांगुन फिर्यादीला त्यांचा इंडिया पोस्ट पेमेंट बँक अकाउंट नंबरवर १,९८,००० रुपुये, त्यांच्या कोटक बँकेचा अकाउंट नंबरवर ५,९९,९९८ रुपये व युपीआय स्कॅनरद्वारे ९९,०४३ रुपये ऑनलाइन भरण्यास भाग पाडून फिर्यादीची एकुण ८,९७,०४१ रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ३०/०९/२०२२) रोजी दु. २.०० ते ४.०० वाजेच्या दरम्यान वाल्हेकरवाडी येथे घडली. महिला फिर्यादीने मो.नं. ९१६२९५५४०४३८ धारक व इंडिया पोस्ट पेमेंट बैंक अकाउंट नं ०५४५१०१९८५८० तसेच कोटक बँकेचा अकाउंट नं.५२४७५६६६७८ धारक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी १७६/२०२३ भा.द.वि. कलम ४०६,४२० माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चेकलम- ६६ (क) नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















