न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२३) :- कनक स्पा ची मालकीन आरोपी नं १ हिने आरोपी नं २ हीच्या सांगण्यावरुन पिडीत ४ महीलांकडुन बळजबरीने मसाज पार्लरच्या नावावर वेश्याव्यवसाय करवुन घेतला.
त्या कमाईतील २०५० रूपये किंमतीची अर्धी रक्कम स्वतः घेवून स्वतःची उपजीवीका भागवली. ही घटना (दि. २०) रोजी ४.३० वाजता कनक स्पा, ओंकार कॉलनी, दत्तमंदिर रोड, वाकड येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी दोन महिलांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ३९६ / २०२३ भा.द.वि कलम ३७०, ३७० (अ) (२), ३४ अनैतिक व्यापार प्रतिबंध का १८५६ क ४ नुसार गुन्हा दाखल करीत एकीला ताब्यात घेतले आहे.
















