न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२३) :- रस्त्याच्या कडेला हातगाडा लावून कुरकुरे, बॉबी विकत असताना रॉयल इन्फिल्ड बुलेट (एमएच१२एनझेड७८०७) वरील आरोपी चालकाने भरधाव वेगाने दुचाकी चालवून वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन फिर्यादीच्या भावास धडक दिली. अपघातात डोक्यास गंभीर जखम होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
राजेभाऊ बापुराव शिंदे (वय ४५ वर्षे, मोशी) असं अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. आरोपी वाहनचालक त्यास कारणीभूत झाला आहे. हा अपघात (दि. १९) रोजी ७.३० वाजता महाराजा चौक, संतनगर, मोशी येथे घडला.
फिर्यादी काशीनाथ बापुराव शिंदे (वय ४९ वर्षे, मोशी) यांनी आरोपी सागर किसन कांबळे (वय ३२ वर्षे, रा. मोशी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी १६७/२०२३ भा.द.वि. कलम २७९,३०४ (अ), मो. वा. काकलम १८४, ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















