न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२३) :- महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. बांधकाम व्यवसायिकाचे साहित्य चोरी करणा-या सराईत तीन गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडुन ७,९७,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुसऱ्या कारवाईत वेअर हाऊसमध्ये चोरी करणा-या सराईत दोन गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडुन ५,४९,२७८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पहिल्या कारवाईत सावरदरी येथील रितेश कोठारी यांच्या आरसीसी बांधकामच्या पार्किंगमधील मोकळ्या जागेतून बांधकामासाठी लागणारे लोखंडी सेंटरिंग प्लेटा, गोलाकार लोखंडी पाईप, लोखंडी शिकंजा असा एकुण २,९७,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींनी चोरुन नेला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८२/२०२३ भा.दं.वि. कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
याप्रकरणी पोलीसांनी अली अब्दुल रहीम साहु (वय २६ वर्षे, रा. भादमुस्थकम, ता. सोरथगड, जि. सिदार्थनगर, उत्तरप्रदेश’ सध्या रा. अजिजा पार्क, जाधववाडी रोड, कुदळवाडी), जमाल अख्तर सबिर अहमद चौधरी (वय ३८ वर्षे, मुळ रा. क्रांतीनगर उल्हास नगर ५ वसंतबहार रोड उल्हासनगर ठाणे, सध्या रा. अजिजा पार्क, जाधववाडी रोड, कुदळवाडी), मोहम्मद इसरार मेहमुद शाह (वय-३२ वर्षे, रा. गट नंबर- ९०२, टावर लाईन जवळ कुदळवाडी, चिखली, मुळगाव-मु. पो. गुलरीया, इटवा, जि. सिध्दार्थ नगर, उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चौरीस गेलेला ७,९७,००० किंमतीचे बांधकाम साहित्य त्यामध्ये लोखंडी सेट्रिंग प्लेटा, गोलाकार लोखंडी पाईप, लोखंडी शिकंजा व टाटा कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे
कुरूळी येथील आरपीसी सप्लाय चैन सोल्यूशन प्रा. लि. कंपनीमधील वेअर हाऊसच्या पाठीमागील बाजूच्या पत्र्याचे शेड उचकटून आतमध्ये प्रवेश करून आरोपींनी ५,१९,२७८ किंमतीचे फोर्थ, फिफ्थ सिक्स सिंक्रो नायझर रिंग, डेल व एच पी कंपनीचा लॅपटॉप, ५० इंची लॉईड कंपनीचा एल ई डी टिव्ही चोरुन नेला होता. महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. १८५/२०२३ भा.द.वि.क. ४६१.३८० प्रमाणे फिर्यादी कल्पेश रणजितसिंह वेद यांनी गुन्हा दाखल केला होता.
आलम युसूफ मणियार (वय-३२ वर्षे, भंगार व्यवसाय, रा. कुदळवाडी, मुळगाव जमनापूर ता. उचाहार, जि. रायबरेली, उत्तर प्रदेश), गणेश रामबाबू निशाद (वय-२२ वर्षे, भंगार व्यवसाय, रा. गवळी माथा झोपडपट्टी, बँकेच्या मागे, भोसरी टेल्को रोड, मुळगाव विष्णूपुरा जनहा गोरखपुर, उत्तरप्रदेश) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेला ५.४९.२७८/ किंमतीचे फोर्थ, फिफ्थ सिक्स सिंक्रो नायझर रिंग, डेल व एच पी कंपनीचा लॅपटॉप, ५० इंची लॉईड कंपनीचा एल ई डी टिव्ही व मोटार सायकल जप्त करण्यात आला आहे. यापैकी आलम युसूफ मणियार याच्यावर पिंपरी, चाकण, भोसरी, पौड़, महाळुंगे या पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील, पोलीस उप निरीक्षक विलास गोसावी, सपोफी थेऊरकर पोहवा राजू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर पोना संतोष काळे, किशोर सांगळे, विठ्ठल वडेकर, मपोना जमदाडे पोकों/ शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विलास गोसावी, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
कंपनीना आवाहन…
कंपनी परिसरामध्ये सिक्युरिटी गार्ड नेमावेत. तसेच सी सी टि व्हि कॅमेरे व लाईट लावाव्यात. कंपनी परिसरामध्ये संशयित इसम फिरताना मिळुन आल्यास महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीसांशी संपर्क साधावा. त्यामुळे कंपनीमधील तसेच इतर चोरीस प्रतिबंध निर्माण होईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


















