- १४ जणांच्या टोळीकडून तिघांना बेदम मारहाण; पिंपरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२३) :- जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादी यांचा भाचा व पतीला आरोपी क्र १ ते ४ यांनी संगणमताने लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. आरोपी ५ हिने फिर्यादीच्या पाठीत विट मारली. आरोपी १ व २ या दोघांनी उलट्या कोयत्याने फिर्यादीचा भाचा याच्या डोक्यावर मारून जखमी केले. त्याला औषधोपचारासाठी वाय.सी.एम. हॉस्पीटल येथे नेले. त्यावेळी आरोपी ६ म्हणाला, तुझा कंड जिरवण्याकरीता आलेलो आहोत. फिर्यादीस वाईट शिवीगाळ केली. महिला आरोपी ७,१२,१३, १४ यांनी फिर्यादी यांचे केस पकडून नखाने ओरखडून, फिर्यादीच्या अंगावरील कपडे फाडून, बेदम मारहाण केली. आरोपी ७ म्हणाली माझ्या मुलाच्या अंगावर रिक्षा घालता काय?, आरोपी १२ हिने फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले. इतर आरोपी यांनी फिर्यादीच्या पतीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरोपी राजरत्न ‘तुला आणि तुझे घरदार संपवून टाकतो, तु आमच्या एस. आर.ए च्या कामाला अडथळा करतो, सही देत नाही का? असे म्हणत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देवून लोखंडी काठीने हत्याराने फिर्यादीच्या पतीच्या डोक्यात मारले, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. २०) रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास व (दि. २१) रोजी रात्री १.३० च्या सुमारास सार्वजनिक शौचालय, यशवंतनगर, पिंपरी वायसीएम हॉस्पीटल येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी १ शंकर संभा चौधरी, २ गौरव शंकर चौधरी, ३ प्रदिप बंकट शिंदे, ४ स्वप्नील महाविर गायकवाड, ५ महिला आरोपी, ६ परमेश्वर चौधरी, ७ महिला आरोपी, ८ अविनाश चौधरी, ९ गौरव चौधरी, १० स्वप्नील गायकवाड, ११ प्रदिप शिंदे, १२ महिला आरोपी, १३ महिला आरोपी, १४ महिला आरोपी (सर्व रा. यशवंतनगर, पिंपरी, आरोपी यांचे ७ ते ८ मित्र नाव पत्ते माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ४६३ / २०२३ भा.द.वि. कलम ३२४, ३२३,१४३, १४७, १४९, ५०४, ५०६, महा. पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















