न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२३) :- पुणे पलानी टस्कर्स विरुद्ध ठाणे हम्पी हिरोज यांच्यात आजच्या दिवसाची शेवटची लढत झाली. पुणेने प्रमोशन फेरीतील पहिला सामना गमावला होता तर ठाणे संघाने नाशिक संघाला नमवत पहिला सामना जिंकला होता. ठाणे संघाला नमवत पुणे संघाने प्रमोशन फेरीत पहिला विजय मिळवला.
सामन्याची सुरुवात अतिशय शांत झाली होती. पहिल्या दहा मिनिटात 6-6 असा सामना बरोबरीत सुरू होता. पुणे संघाकडून पृथ्वीराज शिंदेने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. मध्यांतरापूर्वी काही मिनिटं शिल्लक असताना पुणे संघाने ठाणे संघावर लोन पडत 21-12 आघाडी मिळवली. पुणे कडून पहिल्या हाफ मध्येच पृथ्वीराज शिंदे ने हाय फाय पूर्ण केला. तर ठाणे कडून एकट्या मंगेश सोनावणे ने 12 पैकी 9 गुण मिळवत चांगला खेळ केला मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही.
पुणेच्या संघाची बचावफळीने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केलं तर ठाणे संघाच्या बचावफळीत कमतरता जाणवत होती. सामन्याची शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना पुणे संघाकडे 32-27 अशी आघाडी होती. ही आघाडी कायम ठेवत पुणे संघाने 36-30 असा विजय मिळवला. पुणे कडून पृथ्वीराज शिंदे ने चढाईत 4 तर पकडीत 6 गुण मिळवत विजयात मोलाची भूमिका निभावली. भूषण तपकीर ने 5 महत्वपूर्ण गुण मिळवले. तर ठाणे संघाकडून मंगेश सोनावणे ने चढाईत 16 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- मंगेश सोनवणे, ठाणे हम्पी हिरोज बेस्ट डिफेंडर- पृथ्वीराज शिंदे, पुणे पलानी टस्कर्स कबड्डी का कमाल- आर्यन राठोड, पुणे पलानी टस्कर्स.
















