न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२३) :- डुडूळगावात बांधकाम व्यावसायिक वसंत काटे यांच्या वतीने यशदा ग्रुप स्प्लेंडीड पार्क येथे “गेट टुगेदर” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश लांडगे उपस्थित होते. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
समाविष्ट गावांमधील डुडूळगाव येथील आजपर्यंतचा सर्वात मोठा सदनिका प्रकल्प म्ह्णून ‘यशदा ग्रुप स्प्लेंडीड पार्क’ या गृह प्रकल्पाकडे पाहिले जाते. नागरिकांनी या प्रकल्पाला पसंती दिल्याने या परिसराचा विकास होण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या माध्यमातून आ. लांडगे आणि माजी महापौर नितीन काळजे यांनी केलेल्या विकासकामांमुळे या गावाला वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असे मत विकसक वसंत काटे व्यक्त केले.
प्रसंगी, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खेळ रंगला पैठणीचा या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देवून गौरविण्यात आले. तसेच, सोसायटीतील नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांचा सन्मान करण्यात आला.


















