- दोन महिलादेखील घालू शकतात मुलांना जन्म…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२३) :- ‘असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी’ (एआरटी) तंत्रज्ञान इतक्या वेगाने विकसित होत आहे की, भविष्यात दोन महिला एकत्र येऊन मूल जन्माला घालू शकतील. पुरुषाची गरज पडणार नाही, अशी माहिती ‘फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. हृषिकेश पै यांनी नुकतीच दिली.
नागपूर येथे ‘नॅशनल ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी’ चा (एनओजीएस) पदग्रहण सोहळा व त्यानंतर आयोजित परिषदेत बोलत होते. पदग्रहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. पै व चित्रपट कलावंत डॉ. श्वेता पेंडसे उपस्थित होत्या.
डॉ. पै यांनी सांगितले, महिलांना भविष्यात मूल होऊ शकते, कारण एका जोडीदाराच्या त्वचेच्या पेशी शुक्राणूंच्या पेशींमध्ये बदलल्या जाऊ शकतात. ज्याचा उपयोग दुसऱ्या जोडीदाराच्या अंडींना फलित करण्यासाठी केला जाऊ शकतो. पुढील १० वर्षांत मुले जन्माला घालण्यासाठी गर्भाची गरज भासणार नाही. प्रयोगशाळेत वाढलेली बाळे हे वास्तव असेल. एका शतकाहून अधिक काळापासून शास्त्रज्ञ यावर काम करत आहेत. मात्र, हे तंत्रज्ञान भारतासारख्या देशात पोहोचण्यास अनेक वर्षे लागू शकतात.


















