न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०२३) :- श्री. साईबाबा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, बिरदवडी या संस्थेची सन २०२३ – २०२८ करिता पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु होती. दरम्यान अज्ञात इसमाने मतमोजणीमध्ये विशिष्ठ उमेदवारांना फायदा होण्याच्या उद्देशाने तोतयेगिरी केली.
मतपत्रिका हुबेहुब बनावट छापून त्यावर नकली मोहर तयार करून विशिष्ठ उमेदवारांचे नाव व चिन्हासमोर शिक्के मारले. मतपत्रिकेच्या मागे केंद्राध्यक्ष यांच्या शिक्याप्रमाणे शिक्का मारुन हुबेहुब सही करून त्यांचे २५ व ५० चे गठ्ठे तयार केले. हे गठ्ठे बदलण्याच्या तयारीत असतानाच फिर्यादीच्या हा प्रकार निदर्शनास आला.
ही घटना (दि. २३/०४/२३) रोजी ५.३० वा. चे दरम्यान श्री शिवाजी विद्यामंदिर, चाकण येथे घडला. फिर्यादी सुनिल महादेव धादवड (रा. पिंपळे गुरव) यांनी आरोपी अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी ४०७/२०२३ भादवी कलम ४१७,४१९, ४२०, १७१ (फ), ४६५, ४६६, ४६८,४६९,४७१,४७४, ४७६, ४८४, ४८५, ४८८,५११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.