न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०२३) :- आप-आपसात संगणमत करुन आरोपी हे हातात कोयता घेवुन सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविण्याच्या उद्देशाने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाची तोडफोड करुन आरडा ओरडा करीत जात होते. त्यावेळी फिर्यादीने त्यांना आरडाओरड का करता असे विचारले. त्यावर फिर्यादीला ‘ मादरचोद तु आम्हाला ओळखत नाहीस का, आम्ही टॉवर लाईनचे दादा उमेश उदागे व रोशन सोनवणे आहोत आणि तु आम्हाला विचारतो का” असे म्हणुन आरोपींनी शिवीगाळ करुन फिर्यादीवर दगड फेकुन मारले. दगड फिर्यादीस न लागता ते त्याच्या अशोक लिलँड टेम्पोला लागुन त्यामध्ये टॅम्पोचे नुकसान झाले. आरोपी क्र १ याने कोयता घेवुन अंगावर धावुन येवुन मारण्याचा प्रयत्न करुन शिवीगाळ करुन धमकी दिली. इतर वाहनाची तोडफोड करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे.
ही घटना (दि. २९) रोजी पहाटे २.०० च्या सुमारास शिवशक्ती हौसींग सोसायटी, सहयोगनगर, रुपीनगर टावर लाईन, तळवडे येथे घडली.
फिर्यादी सुनिल सोपान बरबटे (वय ५१ वर्षे, तळवडे) यांनी आरोपी उमेश भारत उदागे (वय २५ वर्ष रा. आंबेडकर नगर लांडेवाडी भोसरी), रोशन रविद्र सोनवणे (वय २४ वर्ष रा पाटीलनगर चिखली) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी २८८/२०२३ भादवि कलम ३०८,५०४, ५०६, ३५२,३४, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) सह क्रिमिनिल लॉ अॅमेन्डमेंट चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे.