न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२३) :- पायी जाताना भैरोनाथ इंडस्ट्रीयल कंपनी, कुदळवाडी चिखली येथे फिर्यादीच्या पाठीमागुन आरोपी हा त्याची चार चाकी गाडी घेवुन फिर्यादी जवळ आला. फिर्यादीला थांबण्याचा इशारा केला. फिर्यादी या कंपनीत जात असताना त्याने फिर्यादीचा पाठलाग केला.
तसेच फिर्यादी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कंपनीतून कामावरुन सुटल्यानंतर घरी जात असताना गेटच्या बाहेर थोडयाच अंतरावर त्याने पुन्हा फिर्यादीचा पाठलाग करून ‘रुको मुझसे बात करो, में तुमसे प्यार करता हु, तुमसे शादी करना चाहता हु’, असे म्हणुन फिर्यादीचा डावा हात पकडुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न करुन फिर्यादीला मारण्याची धमकी दिली व फिर्यादीला मोबाईलवर संपर्क करून त्रास दिला.
हा प्रकार (दि ६) रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास कुदळवाडी चिखली येथे घडला. महीला फिर्यादीने सिध्दांना बसवराज कमाडगी (पत्ता महीत नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ३०७ /२०२३ भा.द.वि. कलम ३५४,३५४ (ड), ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















